ताकई ते आडोशी रस्त्यासाठी उपोषण

| पाताळगंगा | वार्ताहर |

साजगाव ते ताकई रोड या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून अनेक वाहने तसेच शालेय विद्यार्थी, कामगारांची वर्दळ सुरु असते. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, तसेच या रस्त्याचे काम उत्तम प्रकारे व्हावे यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

भाऊबीज सणाच्या दिवशीच हे उपोषण करण्यात येत असल्याने गावातील महिला पुढे आल्या आहेत. त्यांनी उपोषणकर्ते जांभळे यांचे करुणा दिनेश पाटील यांनी औक्षण करत भाऊबीज साजरी केली. करुणा पाटील या अखिल पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया खालापूरच्या तालुकाध्यक्ष आहेत. जांभळे यांनी साजगाव फाटा येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. समाज हितासाठी करण्यात येत असलेल्या या आंदोलनाला महिला वर्गांनी पाठिंबा दिला आहे. झोपलेल्या अधिकाऱ्यांंना जाग आण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे. जांभळे यांनी अनेक आंदोलने करून विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे या उपोषणाची संबंधित प्रशासन दखल घेईल असा विश्वास ग्रामस्थांना आहे.

Exit mobile version