| कोर्लई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करून कायम करण्याची शिफारस करावी, यासह प्रलंबित मागण्यांसाठी सिंहगड रस्ता परिसरासह सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
समग्र शिक्षा योजनेतील 3500 कर्मचारी कंत्राटी स्वरूपात गेले वीस वर्ष आपले शिक्षणाचे योगदान देत आहेत आणि तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. आज पर्यंत शासनाने फक्त आश्वासनच दिले, परंतु त्यांना नियमित केले नाही. जिल्हा परिषदेमध्ये दहा वर्षे काम केल्यानंतर नियमित केले जाते त्यांच्या नियुक्ती सरपंचांच्या अधिकारात असतात. वनखात्यात तात्पुरते घेतलेले कर्मचारी नियमित केले एवढेच नव्हे तर शासनाने आमच्या समग्र शिक्षा योजनेमधील अर्ध्या कर्मचाऱ्यांना नियमित केले आणि आमच्यावर मात्र अन्याय होत आहे त्यासाठी तीन हजार पाचशे कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे आंदोलन आणि उपोषणाला सुरुवात केली असल्याची माहिती राज्याचे सल्लागार विश्वनाथ म्हात्रे यांनी दिली.
नागपूर येथे समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
