| मुंबई | वृत्तसंस्था |
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलिस पाटलांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील पोलिस पाटील महाराष्ट्र राज्य आणि गाव कामगार पोलिस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.28 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करून ती दरमहा अठरा हजार रुपये करावी, ग्राम पोलिस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य द्यावे, पहिल्या पाच वर्षांनंतर नूतनीकरणाची अट बंद रद्द करावी, स्वतःसह कुटुंबीयांना आरोग्य विम्याचा लाभ मिळावा, निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षांपर्यंत करावे, तालुका प्रशासन भवनाच्या इमारतीत तालुकास्तरावर पोलिस पाटील भवन मिळावे, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करणार आहेत. याबाबत तालुका शाखांनी स्थानिक आमदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यात लेखी निवेदने देण्यात आली आहेत, असे बाळासाहेब शिंदे पाटील यांनी सांगितले.