आंदोलनकर्त्यांचे अटक वॉरंट रद्द; आगरी कोळी युथ फाऊंडेशनचा पुढाकार

1984 च्या लढ्यातील 42 आंदोलनक

| उरण । वार्ताहर ।

सिडकोने स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनींचे संपादन करून एकविसाव्या शतकातील नवी मुंबई शहर वसवले. परंतु याच्या पाठीमागे साडेबारा टक्के चा भूमिपुत्रांचा लढा पुन्हा नव्याने जागा झाला कारण ऐरोली विधानसभा अध्यक्ष आणि कोपरखैरणे गावाचे संदीप जनार्दन पाटील ह्यांना कोपरखैरणे गावातील काही वरिष्ठांचा फोनवर संपर्क झाला. आणि 1984 साली जो 12.5 टक्के संदर्भातील भूमीपूत्रांचा लढा झाला होता, त्याच्या न्यायालयीन खटल्याच्या अनुषंगाने अटक वॉरंट निघाल्याचे आणि दुसर्‍याच दिवशी म्हणजे सोमवारी 23 जानेवारी 2023 रोजी कोर्टात हजर राहण्याबाबत पोलिसांकडून कळवले आहे, असे सांगितले.

पाटील ह्यांनी तातडीने हालचाल करत एकूण किती जणांना अटक वॉरंट निघाले आहे ह्याची माहिती घेतली आणि तातडीने आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश ज्ञानेश्‍वर पाटील ह्यांना तातडीने त्याबाबत कळवले. भूमिपुत्र चळवळीला नेहमी सहकार्य करणार्‍या गोठीवली गावातील वकील समीर पाटील ह्यांना संपर्क साधला आणि त्यांनी भूमिपुत्र चळवळीतील वकील मंडळी ह्यासाठी विनाविलंब आणि विनामोबदला सहकार्य करतील असे आश्‍वस्त केले. सोमवार (दि.23) रोजी अध्यक्ष निलेश पाटील ह्यांनी ज्या पोलीस स्टेशन मधून अटक वॉरंट निघाले होते, तेथे संपर्क करून कोर्ट केस बद्दल पूर्ण माहिती घेतली आणि तातडीने ती वकील ऍड समित पाटील ह्यांना कळविले.

अ‍ॅड. समित पाटील कोर्टात आपल्याला अपेक्षित त्या न्यायालयीन कागदपत्रांसह हजर होते. पुढे पाटील आणि अध्यक्ष निलेश पाटील यांनी 1984 च्या लढ्यातील आंदोलनकर्ते प्रकाश पाटील आणि विनोद भगवान म्हात्रे तसेच, ह्या लढ्यातील मयत हरिश्‍चंद्र कृष्णा म्हात्रे ह्यांचे बंधू आणि सोबत नातेवाईक अजय म्हात्रे आणि हर्षला म्हात्रे पाटील ह्यांच्या सह बेलापूर कोर्टात हजर झाले. कोर्टातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत कोर्टाला सदर अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली, आणि त्यांच्या विनंतीचा मान राखत कोर्टाने 42 आंदोलांकर्त्यांसाठी काढलेले दोन्ही अटक वॉरंट रद्द केले. पुढे 13 फेब्रुवारी ची तारीख देन्यात आली आहे. सदर खटल्याप्रकरणी भूमिपुत्र चळवळीतील वरिष्ठ वकील अ‍ॅड. एच. बी. पाटील, अ‍ॅड. अमित पाटील, अ‍ॅड. समीर पाटील, अ‍ॅड. सुनील पाटील ह्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तर अ‍ॅड. महेश पाटील आणि अ‍ॅड. कृष्णा पवार ह्यांनी ही सोबत केली.

Exit mobile version