। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई शिवसेना पुरस्कृत शिवतेज मित्र मंडळ तर्फे बेलापूर येथील सी. एन. जी. पेट्रोल पंप शेजारील मैदानावर शिवसेना नेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी कोळी कोकण संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. याचे उद्घाटन मंडळाचे पदाधिकारी प्रकाश आमटे यांच्या हस्ते झाले.
या महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स तसेच पाळण्यांसोबत आगरी कोळी लोकांच्या पसंतीच्या जेवणाचे स्टॉल्स मांडण्यात आलेे आहेत. याशिवाय रोज श्रीकांत मुंबईकर प्रस्तुत कला सागर लावणी, जल्लोष, गौरव महाराष्ट्राचा, चिंतामणी अकॅडमी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा, स्टेप आर्ट प्रस्तुत जल्लोष सुवर्णयुगाचा, डी महेश खेळ पैठणीचा, सांस्कृतिक कार्यक्रमासोबत आरोग्य शिबीर तसेच 11 नोव्हेंबरला संस्थापक शिवतेज मित्र मंडळ बेलापूर विशाल कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त साई भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशाल कोळी, भूषण मोरे, रामा कोळी, पांडुरंग बिरादार, प्रकाश आमटे, नागेश पाटील, धवल जैन, मंगेश कोळी, बबन बाबर, हेमंत जयस्वाल, मिठू पिंपळ, मनोहर उभारे, राजेंद्र चव्हाण, वेदांत कोळी, गणेश म्हात्रे, कुलदीप म्हात्रे, विलास म्हात्रे, तेजस्वी कोळी, सुनंदा कोळी, सविता पाटील. वैशाली आमटे, योगिता आमटे, राजेश्री मोरे,अर्चना बिरादार, स्वप्ना कोळी, कुसुम पाटील, कल्पना पाटील, लीना म्हात्रे, अविना म्हात्रे, वेदांती कोळी, नियती पाटील, मानसी कोळी, यश आमटे आदी मेहनत घेत आहेत