श्रीकांत पाटील यांना आगरी समाज शिक्षण भूषण पुरस्कार

। अलिबाग । वार्ताहर ।

कोपरखैरणे, नवी मुंबई येथील 19 व्या राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलनात अलिबाग येथील राज्य पुरस्कार प्राप्त निवृत्त प्राचार्य श्रीकांत पाटील यांना आगरी शिक्षण भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

संमेलनाचे प्रमुख अतिथी जी.पी.पारसिक बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड, ज्ञान विकास संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.पी.सी.पाटील, दशरथ पाटील, प्रा.अरुण म्हात्रे, माजी खा. जगन्नाथ पाटील, मोहन भोईर, प्रसाद पाटील, शिवराम पाटील, दशरथ भगत, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, रवि पाटील, पुंडलिक म्हात्रे, चंद्रकांत मढवी, जयश्री पाटील, संदीप पाटील, हरिभाऊ घरत उपस्थित होते. पाटील यांनी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाळांमध्ये पंचवीस वर्षे मुख्याध्यापक व एकूण छत्तीस वर्षे उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच राज्य मुख्याध्यापक संघटनेचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेला आहे. ते रायगड भूषण असून, कृषीवल कौतुक पुरस्काराने सन्मानित आहेत. यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Exit mobile version