। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या सभागृहात कृषी संजीवनी सप्ताहा निमित्ताने पहिल्या वर्गाचा कार्यक्रम शनिवारी, 25 जून रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमात अनेकांनी सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमात सुरुवातीला जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, कृषी उत्पन्न संचालक दत्तात्रेय काळभोरे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, चिंचवली सरपंच राजाभाऊ गावंड, तालुका कृषी अधिकारी श्रीमती सावंत, कृषी पर्यवेक्षक एस.एस. बागव, गरांडे, नारंगी सज्जा कृषी सहाय्यक गजेंद्र पाटील, तारेवणे व फारस उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर अधिकार्यांनी कृषीविषयक माहिती दिली.
या कार्यक्रमात सप्ताहाच्या पहिल्या वर्ग नियोजनात चिंचवली, वाघ्रण, मांडवखार, नारंगी, पेढांबे इत्यादी गावांतील अनेक शेतकर्यांचा सहभाग होता. विशेषतः युवक आणि महिलांनी देखील सहभाग नोंदवून माहिती जाणून घेतली. हा कृषी वर्ग यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्याक गजेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. आभाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.