कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत मुरुडमध्ये शेतकरी संवाद

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषी संजीवनी मोहिम आयोजित करण्यात आली असून त्याचाच भाग मुरुड मध्ये तालुका सुपारी संघात कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, कृषी उपसंचालक दत्तात्रेय काळभोर, सुपारी संघाचे अध्यक्ष महेश भगत, तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ, मंडळ कृषी अधिकारी विश्‍वजीत अहिरे तसेच सुपारी संघातील अधिकारी पदाधिकारी, सदस्य कृषी सहाय्यक आदिराज चौलकर, विशाल चौधरी, मनोज कदम, मनीषा काळे यांच्या उपस्थितीत कृषी संजिवनी सप्ताह अंतर्गत कार्यक्रम राबवण्यात आला.

यावेळी स्मर्ट कृषी प्रकल्प विषयी चर्चा करण्यात आली व अडचणीचे निराकरण करण्यात आले. तसेच कुंडलिका फार्मर्स प्रोड्युसर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मंगेश शेडगे उपाध्यक्ष सुदाम वाघीलकर तसेच इतर सभासद यांच्याशी देखील स्मार्ट योजनेमध्ये सहभाग घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कृषी संजीवनी सप्ताहामध्ये मुरुड तालुक्यातील गावात जाऊन शेतकर्‍यांच्या सभा, वेबिनार, प्रात्यक्षिक, प्रशिक्षण आतापर्यंत 40 पेक्षा जास्त गावांमध्ये राबविले आहेत. उर्वरित गावांमध्ये 1 जुलै पर्यंत राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला शेती शाळा घेण्यात आली आणि महिला बचत गटांना सक्षम सक्षमीकरणासाठी ऑनलाइन वेबिनार आयोजित करून तज्ञ लोकांचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रगतशील शेतकरी यांनी वापरलेले तंत्रज्ञान आणि त्यांचे अनुभव शेतकर्‍यापर्यंत वेबिनारद्वारे पोहोचण्यात आले.

कृषी विभागाच्या विविध योजना मग्रारोहयो फळबाग लागवड, शेततळे, भात पिक विमा, फळ पिक विमा, भात लागवडीच्या आधुनिक पद्धती, किड व रोग नियंत्रण, यांत्रिकीकरण इत्यादी विषयी मार्गदर्शन व त्यांच्या शंकांचे निरसन कृषी सहाय्यक यांच्यामार्फत करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Exit mobile version