| नाशिक | प्रतिनिधी |
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या शेतीची शनिवारी पाहणी केली. यावेळी एका शेतकर्यानं त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला, प्रश्न ऐकताच ते चांगलेच संतापले, त्यांनी उलट शेतकर्यांनाच सुनावले आहे. कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करत फिरता, असे अजब विधान कृषीमंत्री कोकाटे यांनी केल्याने राज्यभरातील शेतकर्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकर्यांना धीर देण्याचे सोडून कृषीमंत्र्यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे चीड व्यक्त होत आहे.
कृषीमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
