| नागपूर | प्रतिनिधी |
जादुटोनाच्या माध्यमातून ‘माथाडी कामगार’ म्हणून मुलाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 52 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली. याप्रकरणी, आध्यात्मिक उपचारक असल्याचे भासवणाऱ्या एका व्यक्तीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. संजय रामदास शिरोडे (50) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मजुरीचे काम करीत असून, तिच्या पतीला संजय शिरोडे याने 21 वर्षीय मुलाला ‘माथाडी कामगार’ म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने नोकरी मिळवून देण्यासाठी एका विशेष पूजेची आवश्यकता असल्याचे सांगितले. दि.27 जून रोजी पूजा सुरू असताना, त्याने महिलेच्या पतीला आणि मुलाला जवळच्या झाडांची मुळे आणण्यासाठी बाहेर पाठवले. त्यानंतर महिला घरात एकटी घरात असताना, त्याने तिला बळजबरीने बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, दि. 5 जुलै रोजी पीडित महिलेने अखेर आपल्या पतीला याबद्दल माहिती दिली. हुडकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला.






