। सावंतवाडी । प्रतिनिधी ।
आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या तेंडुलकर कुटुंबीयांना श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकार्यांनी भेट देऊन नवरात्रोत्सवाला जमा झालेल्या अन्नधान्यातून नारळ, तेल, तांदूळ, डाळ, तेल या वस्तूंच्या स्वरुपात मदत केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे, सचिव नीतेश पाटील, कार्याध्यक्ष रोहित लाखे, युवा मंडळाचे अध्यक्ष पवन पाटील, गणेश खोरागडे, साई लाखे आदी उपस्थित होते. तेंडुलकर कुटुंबांची भेट सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांच्या माध्यमातून मंडळाला घडवून आणली. त्यांच्यासह रासाई मंडळाचे तेंडुलकर कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.