| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कडाव इंग्लिश मिडीयम स्कुलमधील इयत्ता दहावी मधील विद्यार्थी सुनीत गायकवाड या विद्यार्थ्याने लांब उडी मध्ये जिल्हा क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. जिल्हा क्रीडा विभाग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत कर्जत तालुक्यातील लांब उडी या स्पर्धेत कडाव इंग्लिश मिडीयम स्कुल चा विद्यार्थी सुनीत गायकवाड हा स्पर्धेत उतरला होता. दहावीमध्ये शिकत असलेला सुनीत याने लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळावीत सुवर्ण पदक मिळविले. सुनीत गायकवाड आता मुंबई विभागीय स्पर्धेसाठी उतरणार आहे. सुनीतच्या या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.