। आगरदांडा । प्रतिनिधी ।
आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मुरुड आणि महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने एड्सविषयी जनजागृतीपर व्याख्यान झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्धन कांबळे तसेच एनएसएस विभाग प्रमुख श्रीशैल्य बहिरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात आयसीटीसी समुपदेशक पूजा तोंडले यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही संक्रमणाचे मार्ग व उपाय एचआयव्हीबाबत समज व गैरसमज तसेच कलंक व भेदभाव एचआयव्ही व एड्स प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2017 व मानसिक आरोग्य समस्या आणि मादक पदार्थांचा दुरुपयोग याविषयी सखोल माहिती दिली. एड्सबद्दलची जागरूकता हेच सर्वात मोठे औषध, सुरक्षिता हीच खरी मोठी ढाल आणि सहानुभूती हीच खरी शक्ती आहे, या तीन गोष्टी अंगीकारल्यास आपण एचआयव्ही विरुद्धची लढाई नक्की जिंकू शकतो हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन करून घेतले. यावेळी असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.







