| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटीसी विभागाअंतर्गत जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक उषा चोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटीसी सामुपदेशक पूजा तोंडले व समीर धांडोरे यांनी वसंतराव नाईक कॉलेज येथील विद्यार्थ्यांना जागतिक एड्स बाबत मार्गदर्शन करून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेे. वसंतराव यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.ए.नगरबावडी, उपप्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस. भैरगुंडे, प्रा.जी.डी. मुनेश्वर, प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.