। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुका पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेल्या ड्रममधून वायुगळती झाली. ही घटना गुरुवारी (दि.1) घडली. यावेळी पोलिसांनी तात्काळ पालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण केले. अग्नीशमनच्या कर्मचार्यांनी तात्काळ ड्रमवर पाणी मारले. ड्रममध्ये कोणतेतरी रसायन असल्याचे या घटनेने निदर्शनास आले. त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.