सिग्नल चाचणीसाठी नवी मुंबई विमानतळावर विमान

Oplus_0

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई विमानतळ परिसरात पहिल्यादाच विमानाच्या सिग्नलची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी विमानतळ परिसरात विमान आल्याने ही चाचणी पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

धावपट्टीवर विमान उतरताना किंवा उड्डाण घेताना कोणता अडथळा येत नाही याची पाहणी करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली. विमान पाहण्यासाठी अनेकजणांनी छोटे कॅमेरे व मोबाईल कॅमेर्‍याने फोटो व शुटिंग करण्यासाठी गर्दी केली होती. मोलमजुरी करणार्‍या महिलांमध्ये देखील विमान पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांनी आयुष्यात प्रथमच विमान पाहिल्याचा आनंद चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.विमान आपल्या जवळ आल्याचे पाहताच सर्वांनी टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले.या चाचणीचा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवण्यात येणार आहे.

Exit mobile version