झिराडजवळ अजंठा बस-कारचा भीषण अपघात; महिला चालक गंभीर

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग- मांडवा मार्गावर झिराडजवळील म्हात्रे फाटा येथे अजंठा बस (एमएच 43 एच 1833) व कारचा अपघात झाला. ही घटना मंगळवारी (दि.26) घडली. या अपघातात कारचा चक्काचुर झाला असून बस झाडावर आदळली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मांडवा ते मुंबई बोटने प्रवास करणार्‍या प्रवाशांना अलिबाग येथून ने-आण करण्याचे काम अजंठा बसमार्फत करण्यात येते. त्यामुळे अपघाताच्यावेळी बसमध्ये प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. या भीषण धडकेत महिला चालकास गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version