अजंठा बोट समुद्रात अडकली; प्रवाशांत भीतीचे वातावरण

भरतीनंतर बोट पुन्हा किनाऱ्यावर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मुंबई येथील गेट वे वरून मांडवा बंदरावर निघालेली अंजठा प्रवासी बोट सकाळी समुद्रात अडकली. ओहोटीचा अंदाज न घेतल्याने हा प्रकार घडल्याची माहीती मांडवा पोलिसांनी दिली. सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप किनारी आणले.

सकाळी बोट गेट वे ऑफ इंडिया येथून निघाली. मांडवा बंदरापासून काही अंतरावर आल्यावर अचानक प्रवासी बोट बंद पडली. बोट बंद झाल्याने प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली. महिला, बालके रडू लागली. भरतीला सुरुवात झाल्यावर एक तासाच्या प्रतिक्षेनंतर बोट पुन्हा सुरू झाली. त्यानंतर किनारी आणल्याची माहीती मांडवा पोलिसांनी दिली.

Exit mobile version