। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभाग प्रदेश संघटकपदी कामथे येथील निष्ठावान कार्यकर्ते अजित कासार यांची निवड करण्यात आली. चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रशांत यादव आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय रेडीज यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी चिपळूणचे उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक करामत मिठागरी, माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, ज्येष्ठ नेते इब्राहिम दलवाई, सुरेश राऊत, अॅड. जीवन रेळेकर, भरत लब्धे, ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव संजय जाधव, दीपक निवाते, शमून घारे, अन्वर जबले, सुरेश पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.