। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व द्रोणागिरी स्पोर्ट्स उरण पुरस्कृत जिल्हास्तरीय हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा द्रोणागिरी श्री 2022, व द्रोणागिरी फिजिक 2022, सोमवारी (दि.3) कोव्हिड नियमांचे पालन करून द्रोणागिरी युथ फेस्टिव्हल 2022 दरम्यान पार पडल्या. रायगड हेल्थ सेंटर उरणचा अजित वामन म्हात्रे द्रोणागिरी श्री 2022 व पावर हाऊस जिम उरणचा साहिल अशोक पाटील द्रोणागिरी फिजिक 2022 चे मानकरी ठरले. बेस्टपोझरचा सन्मान रायगड हेल्थ सेंटर कोप्रोलीचा संकेत संजय वर्तक याला मिळाला.
द्रोणागिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष महादेव घरत, शिवेंद्र म्हात्रे, श्रीकांत शिंदे, नित्यानंद म्हात्रे, संतोष साखरे, जितेंद्र गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. पंच म्हणून विनायक केतकर, सुरेंद्र महाडीक, सुनील राणे, श्रीकांत शिंदे, जितेंद्र गुरव, सचिन पाटील, शैलेश थळी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे गुणलेखन टेरेंस फर्नांडिस व सुरेंद्र महाडीक यांनी केले. स्पर्धेचे सुत्रसंचलन विनायक केतकर व सुरेंद्र महाडीक तर स्टेज मार्शल म्हणून दिपक शिंदे व विक्रांत पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेचे टेक्नीकल डायरेक्टर संघटनेचे सचिव संतोष साखरे होते.







