दादा म्हणतात, तो ‘मी’ नव्हेच..

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

पुणे येथे उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीचे अद्यापही कवित्व सुरु असून, मंगळवारी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असा सूर आळवळा. तसेच जी गाडी गेटला धडकली त्यामध्ये मी नव्हतोच, असे जाहीर केले.

शासकीय ध्वजारोहणानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘पुण्याच्या बैठकीच मनावर घेऊ नका. शरद पवार हे पवार कुटुंबातील ज्येष्ठ वडिलधारी व्यक्ती आहेत. मी त्यांचा पुतण्या आहे. माध्यमं अशा भेटीला प्रसिद्धी देतात. त्यातून समज-गैरसमज निर्माण होतात. फार तिथे काही वेगळं घडलं असं समजू नका’, असेही ते म्हणाले. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया हे पवारसाहेबांचे क्लासमेट आहेत. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवारसाहेब यांच्यासोबत होते असे अजित पवार म्हणाले. दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाणे काय चुकीचे? असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

‘जनतेला सांगेन, यापुढे केव्हाही भेटलो तर त्यातून कुठलाही अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते मी लपून गेलेलो नाही, मी उजळ माथ्याने फिरणारा आहे’ असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.

अपघात झालेल्या गाडीत मी नव्हतो
तर भेटीनंतर अजित पवार बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला असं अनेक माध्यमांनी सांगितलं होतं. त्यासंबधीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यावर अजित पवार म्हणाले, तुम्ही मला लपून गेल्याचं कुठे बघितलं?. मी उद्या तुमच्या घरी आलो, तर कधी निघायच हे मी ठरवणार. मी बैठकीला गेला हे मान्य करतो. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच, असे अजित पवार म्हणाले.
Exit mobile version