अजित पवारांना धक्का! ‘या’ नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

| पुणे | प्रतिनिधी |
ऐन निवडणूकीच्या तोंडावर अजित पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोणत्याही क्षणी प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु झाली होती. याविषयी बोलताना शरद पवार यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगत निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाविषयी कानावर हात ठेवले होते. परंतु, त्याच्या काहीवेळानंतरच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश लंके यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली.

याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. परंतु, या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी, निलेश लंके लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशाविषयीचा सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.

यांच्यासारखे अनेक लोक इच्छूक आहेत. मग त्यांना विचारलं नसतं का? निलेश लंके यांचा आज आमच्याकडे पक्षप्रवेश आहे, हे मलाच माहिती नाही. मी तुमच्याकडूनच ही गोष्ट ऐकतोय, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

Exit mobile version