अजितदादा पवार यांची कारकीर्द

| पुणे | प्रतिनिधी |

जन्म 22 जुलै 1959 – निधन 28 जानेवारी 2026
जन्म 22 जुलै 1959 : देवळाली, ता. राहुरी, जि. अहमदनगर
शिक्षण : बारावी- बीकॉम
वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण
1982 मध्ये पुण्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले.
1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष
1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले
1991 मध्ये खासदारकीचा राजीनामा, बारामती विधानसभा मतदारसंघातून उपनिवडणुकीतून पहिल्यांदा आमदार झाले.
1991 पासून 2024 पर्यंत एकूण आठ वेळा बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले.
30 वर्षांहून जास्त काळ बारामतीचे प्रतिनिधीत्व, प्रत्येक टर्ममध्ये मोठ्या मताधिक्क्याने विजयी.
1991-92 मध्ये कृषी आणि विद्युत राज्यमंत्री – काँग्रेस सरकार
1992-95 मध्ये मृद संवर्धन, विद्युत आणि नियोजन राज्यमंत्री – काँग्रेस सरकार
1999-2004 मध्ये जलसिंचन-कृष्णा खोरे आणि कोकण सिंचन कॅबिनेट मंत्री – काँग्रेस- एनसीपी सरकार
2004-2009 मध्ये जलसंपदा कॅबिनेट मंत्री – काँग्रेस एनसीपी सरकार
2009-10 मध्ये उपमुख्यमंत्री कृषी, ग्रामविकास, नियोजन आदी विभागांचा कार्यभार
काँग्रेस-एनसीपी सरकार
2010-2014 मध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, नियोजन, ऊर्जा विभागाचा कार्यभार
काँग्रेस-एनसीपी सरकार
2019 उपमुख्यमंत्री, भाजप-एनसीपी सरकार
2022-23 उपमुख्यमंत्री – अर्थ, नियोजन विभागाचा कार्यभार, भाजप-शिवसेना शिंदे, राष्टवादी अजित पवार गट
2024-26 उपमुख्यमंत्री आणि अर्थ, नियोजन, उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार, भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी अजित पवार गट

आजचा कार्यक्रम
28 जानेवारी 2026 रोजी, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या.
सकाळी पावणे नउला विमानाच्या लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. विमानात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचे साडेनऊदरम्यान डीजीसीएने सांगितले.
काकांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे
अजितदादांचा जन्म हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील देवळाली येथे 22 जुलै 1959 रोजी झाला. 1982 मध्ये त्यांनी स्थानिक राजकारणात प्रवेश केला. त्यांनी काका शरद पवार यांच्या नेतृत्वात राजकीय धडे गिरवायला सुरुवात केली. शरद पवार यांच्या अनेक निर्णयाचे ते साक्षीदार होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी अनेक पदांवर काम केले. 1993 साली शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा अजितदादांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यासह अनेक खाती सांभाळली.
काकांसाठी खासदारकीचा राजीनामा
1991 साली अजितदादांना काँग्रेसने खासदारकीचं तिकीट दिलं. सर्व उमेदवारांची अगोदर घोषणा झाली. ऐन शेवटच्या टप्प्यात अजितदादांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा पवार हे निवडून आले. पुढे हे दोघे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकत्रित होते. पण, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले. त्यांनी तातडीने शरद पवार यांना संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली. संसद सदस्यत्वासाठी मग बारामती मतदारसंघ सुरक्षित होता. काकांसाठी दोन-तीन महिन्यांपूर्वी निवडून आलेले अजितदादा यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलीच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.
उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड
1995, 1999, 2004, 2009 , 2014, 2019 आणि 2024 असे सलग त्यांनी बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी मंत्रिमंडळात कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले. पाणी पुरवठा, नियोजन राज्यमंत्री, पाटबंधारे, फलोत्पादन, ग्रामीण विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री, तर राज्याचे अर्थमंत्री त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केला. सातवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.
66 वर्षे, 6 महिने, 6 दिवस…
वयाचा विलक्षण योगायोग!

अजित पवार यांच्या निधनानंतर वयाचा एक विचित्र योगायोग दिसून आला आहे. अजित पवारांच्या आयुष्याचा शेवटचा आकडा पाहून अनेकांच्या मनात गूढ शांतता आणि अस्वस्थता दाटून आली आहे. तो आकडा आहे, 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस… अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला आहे. तर, त्यांचं दुर्दैवी निधन आज म्हणजेच 28 जानेवारी 2026 ला झालं आहे. यावरून त्यांचा जीवनकाळ 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस इतका होता. या एक वयाचा अंगावर काटा आणणारा योगायोग दिसून येत आहे. हा योगायोग केवळ आकडा नसून अनेकांना अंतर्मुख करणारा ठरतो आहे.
Exit mobile version