आकाश पाटीलची राज्यस्तरीय निवड

| खांब | प्रतिनिधी |

बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पुरुष गट खो-खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघात एस.एन. एस. स्पोर्ट्स रोहा पुरस्कृत ओम साई राम (सानेगाव) संघाचा खेळाडू आकाश पाटील याची निवड झाली आहे. आकाशने जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत उत्तम कामगिरी करत हे यश मिळविले आहे. त्याच्या या यशामध्ये त्याचे प्रशिक्षक व संघातील इतर खेळाडू यांचा सिंहाचा वाटा आहे. एस.एन.एस. स्पोर्ट्सचे अध्यक्ष अमर सलागरे यांनी त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, आकाशच्या या निवडीबद्दल सानेगाव गावासह संपूर्ण रोहा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version