। खांब रोहा ।वार्ताहर ।
पुणे येथे संपन्न झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राज्यसतरीय खो-खो स्पर्धेत ओम साई राम सानेगाव खोखो क्लब रोहा रायगड संघाने अंतिम सामन्यात आपल्या सर्वीत्कृष्ट कामगिरीचे जोरावर वर्चस्व प्रस्थापित करून विजेतेपदाचा बहुमान पटकावला.
या संघाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकाऊन रोहे तालुक्यासह जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. तर 27 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत पंजाब येथे होणार्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. कर्णधारपदी अनिरुद्ध जवरत,उपकर्णधार साहिल जाधव, कौशल मोरे, हितेश चंदणे, प्रतिक जंगम,मनिष मढवी,हर्षल कोस्तेकर, राज शेलार, यश चोगले, पियूष महाडिक, कार्तिक मुक्तीपाड,रितेश गोवरधने या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर प्रशिक्षक म्हणून सानिका जगदीश वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.