। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अखिलेश यादव यांनी आता लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये करहल मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर त्यांनी आता आपल्या खासदारकीचा राजीनामा सोपवला आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेले यादव यांनी पहिल्यांदाच ही विधानसभेची निवडणूक लढवली आहे. ते आझमगढमधून लोकसभेचे खासदार होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता ते यूपी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद सांभाळतील अशी शक्यता आहे. त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना आपला राजीनामा सोपवला आहे.