| न्यूयॉर्क | वृत्तसंस्था |
फ्रेंच ओपन व विम्बल्डन या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहर उमटवणाऱ्या कार्लोस अल्काराजने अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅमची सुरुवातही धडाकेबाज केली आहे. त्याने पात्रता फेरीमधून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ली तू या खेळाडूचे आव्हान चार सेटमध्ये परतवून लावले आहे. यावेळी कार्लोसने 6-2, 4-6, 6-3, 6-1 असा विजय साकारला असून त्याचा हा ग्रँडस्लॅममधील सलग 15वा विजय ठरला आहे. तसेच, कार्लोस अल्काराजने ग्रँडस्लॅममधील 60व्या विजयाला गवसणी घातली असून कमीतकमी सामन्यांमध्ये विजय साकारणारा दुसरा टेनिसपटू ठरला आहे. अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅम सामन्यात कार्लोसने पहिला सेट जिंकला खरा; पण ली तू याने दुसरा सेट जिंकत बरोबरी साधली. कार्लोसने तिसऱ्या व चौथ्या सेटमध्ये बाजी मारत विजयावर नाव कोरले.







