• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

चालक-वाहकांची मद्यपान तपासणी सक्तीची

Antara Parange by Antara Parange
March 6, 2026
in मुंबई, राज्यातून
0 0
0
चालक-वाहकांची मद्यपान तपासणी सक्तीची
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला 25 जानेवारी 2026 रोजी अचानक भेट दिली असता तेथे काही धक्कादायक प्रकार आढळून आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते. त्याअनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. हा चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांचीही ड्यूटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहणार आहे. चालक व वाहकांची मद्यपान तपासणी झाली आहे की नाही, यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. चालकाने नोंद केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा अल्कोटेस्ट तपासणी करून योग्य नोंद घेतल्यानंतरच पुढील मार्गावर पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही तपासणी नियमितपणे होत आहे की नाही, याची खात्री स्थानक प्रमुखांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय बसस्थानक व आगार परिसरातील चालक, वाहक आणि विश्रांतीगृहांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी आगार व बसस्थानक भेटीदरम्यान या उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या बाबतीत दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मार्गतपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक, चालक-वाहक विश्रांतीगृहे तसेच ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात, अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने मद्यपानासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. या उपाययोजनांमुळे बससेवा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल.

– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Related

Tags: Alcohol testing of driversindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainewsnews indiaonline marathi newssocial media newsstTransport Minister Pratap Sarnaik
Previous Post

उसाच्या रसाला मागणी वाढली

Next Post

धरमतर येथील पेट्रोल पंपाजवळच दुचाकीने घेतला पेट

Antara Parange

Antara Parange

Related Posts

क्रीडा

बोगस क्रीडा प्रमाणपत्राला चाप

March 28, 2026
क्रीडा

शूटिंगबॉल स्पर्धेत मालेगाव विजयी

March 28, 2026
ठाण्यात जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
क्रीडा

ठाण्यात जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

March 28, 2026
वणव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
मुंबई

वणव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

March 28, 2026
विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे

March 27, 2026
‘अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी!
क्रीडा

‘अनधिकृत’ स्पर्धांवर बंदी!

March 27, 2026
Next Post
धरमतर येथील पेट्रोल पंपाजवळच दुचाकीने घेतला पेट

धरमतर येथील पेट्रोल पंपाजवळच दुचाकीने घेतला पेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?