अलिबाग समुद्र किनारी माझी वसुंधरा वाळू शिल्पाचे अनावरण

। अलिबाग विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रीय पर्यटन दिवस या निमित्ताने अलिबाग समुद्रकिनारी माझी वसुंधरा संकल्पनेवर आधारित वाळू शिल्प तयार करण्यात आले. या शिल्पाचे अनावरण अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे आणि मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाले. यावेळी सभापती वृषाली ठोसर, नगरसेवक अनिल चोपडा, संजना कीर, नगर परिषदेचे कर्मचारी आदी मान्यवर, नागरीक उपस्थित होते. अलिबागमधील कलातरंगचे वाळू शिल्पकार महेंद्र गावंड, विशाल भोपी, वेदांत वादळ आणि निर्जला नखाते यांनी हे वाळू शिल्प अतिशय सुरेखपणे रेखाटले आहे. आपली वसुंधरा वाचविण्याचा संदेश देणारे हे वाळू शिल्प अलिबागकर नागरिक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.

Exit mobile version