अलिबाग तालुक्यात कोरोनाचे सात नवे रूग्ण तर दोन कोरोनामुक्त

तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात गुरूवार दि. 9 मे रोजी कोरोनाच्या सात नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन रूग्ण कोरोना मुक्त असल्याची माहिती अलिबाग तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली आहे. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 282 झाली आहे. यापैकी 629 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 22 हजार 623 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 30 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version