अलिबागची खारघरवर मात

ओम भगत सामनावीराचा मानकरी
| रायगड | प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. अ‍ॅड. शिरीष स्मृतिचषक ज्युनिअर गटाच्या 40 षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या लीग सामन्यात जगदीश ढगे क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाने प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी खारघर संघावर विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत खारघर संघाने 40 षटकांच्या समाप्तीनंतर 178 धावा धावफलकावर लावल्या. आकाश सेठी याने सर्वाधिक 93 चेंडूंत 63 धावा केल्या. अलिबाग संघाकडून बाणे 3, तर ओम भगत याने 2 फलंदाज बाद केले.

प्रत्युत्तर देताना अलिबाग संघाकडून सलामीचे फलंदाज पार्थ म्हात्रेने 64, तर प्रांशु तुरे याने 51 धावा काढत 100 धावांची भागीदारी केली व डावाला आकार दिला. प्रांशु तुरे बाद झाल्यानंतर ओम भगतने तुफानी फलंदाजी करीत 25 चेंडूंमध्ये 9 चौकार ठोकत नाबाद धावा काढल्या. त्याला सामनावीर पुरस्कार, तर आकाश सेठी स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, प्रांशु तुरे इमर्जिंग प्लेयर, मंथन पाटील याला बेस्ट फिल्डर म्हणून झुंझारचे सदस्य अजय टेमकर, नितीन बाणे, अमर वार्डे, संचित म्हात्रे, जगदीश ढगे, स्वप्नील कदम, मितेश ठाकूर, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version