जगदीश क्रिकेट अकॅडमी विजयी
| अलिबाग । वार्ताहर ।
झुंझार युवक मंडळ आयोजित कै.अँड.शिरीष पाटील स्मृतीचषक 40 षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील सी.ग्रुपमधील साखळी सामन्यात जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघांनी रायगड रॉयल्स क्रिकेट अकॅडमी संघाचा पराभव करत स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारत रायगड रॉयल्स संघांनी सर्व गडी गमावत 114 धावा धवफलकावर लावल्या,केदार म्हात्रे यांनी 21 धावा काढल्या, अलिबाग संघाकडून ओम भगत यांनी तीन तर मानस राऊत व आर्यन दवटे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
प्रतिउत्तरात अलिबागच्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी धुवाधार फलंदाजी करत सामना सर्व गडी राखून जिंकला, पार्थ म्हात्रे यांनी 48 तर प्रांशु तुरे यांनी 55 धावा केल्या.जगदीश ढगे क्रिकेट अकॅडमी अलिबाग आपल्या गटातील तीन पैकी दोन सामने जिंकून स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. सामन्याचा सामनावीर म्हणून उत्कृष्ट गोलंदाजी करणारा ओम भगत ,स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू केदार म्हात्रे,इमर्जिंग प्लेअर पार्थ म्हात्रे, प्रांशु तुरे ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निधी गद्रे यांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव अनिल गद्रे,अलिबाग वकील क्रिकेट संघाचे कर्णधार अँड. म्हात्रे, नितीन बाणे,जगदीश ढगे, उदय गद्रे,आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.