प्रा. एल.बी. पाटील यांचे उद्गार
| उरण | वार्ताहर |
कोणताही शिक्षक हा चांगलेच संस्कार देत असतो. त्या संस्कारातून विद्यार्थी मोठा झालेला दिसतो, तेव्हा शिक्षकाला केलेल्या सेवेचा मोठा आनंद होतो, असे उद्गार रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील यांनी काढले. तालुक्यातील विंधणे येथे 1982 च्या दहावीव्या विद्यार्थ्यांनी त्यांना शिकविणार्या शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. ए.डी. पाटील, रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील, सुपडू महाजन, छगन कोल्हे, बी.के. भगत या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात नाथा नाईक या विद्यार्थ्याने (आजचे प्राचार्य) यांनी त्यांनी सांगितले की, आज आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी सुखी आहोत, त्याचे कारण शिक्षकांनी अतिशय घेतलेली मेहनत आणि दिलेले संस्कार. श्री व सौ प्रशांत जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी विद्यार्थी उद्योगपती प्रशांत जोशी यांनी एका फार्म हाऊसवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मदन पाटील, बळीराम चिरलेकर यांनी कार्यक्रम यशस्वी मेहतन घेतली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. प्रा. ए.डी. पाटील, प्रा. एल.बी. पाटील, शरद घरत, नाना म्हात्रे यांनी कविता वाचन केले. यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.