| चिरनेर | वार्ताहर |
कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत रविवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी उरण तालुक्यातील विंधणे कातकरी वाडीवर उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता अभियान प्रथम टप्प्यात उरण तालुक्यातील सर्व वाड्यांवर राबविण्यात येईल. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.सरपंच निसर्गा डाकी यांनी या स्वच्छता अभियानात विशेष पुढाकार घेतला होता. तर, या अभियानाची संकल्पना सामजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, सुनील जोशी, दत्ता गोंधळी, मनीष कातकरी, राजेंद्र मढवी, गोपाळ पाटील यांची यावेळी वाडीवरील सर्व आदिवासी महिला या अभियानात सहभागी झाल्या होत्या.