| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी अलिबाग नगरपरिषदेतर्फे शहरातील सार्वजनिक वाचनालयातील डोंगरे हॉल येथील लसीकरण केंद्रावर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान होणाऱ्या या लसीकरण मोहिमेत 100 लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचे ऑनलाईन नोंदणीद्वारे 100 तर 100 लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचे ऑफलाईन नोंदणीद्वारे 100 डोस दिले जाणार आहेत.
अलिबाग न.प.तर्फे डोंगरे हॉल येथे होणार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण
