अलिबाग शहरात भरदिवसा घरफोडी करणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग शहरात भर दिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणी चोरट्याला जेरबंद करण्यात स्थनिक गुन्हे अन्वेषण शखेला यश आले आहे. 14 दिवसात घरफोडीचा छडा लावल्याबद्दल स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कौतुक केले जात आहे.अलिबाग शहरात 8 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11.30 ते 12-20 वाजण्याच्या सुमारास अलिबाग बाजारपेठेतील ओझोन रेसीडेन्सी बिल्डींगमधील फिर्यादी रूपेश कांतीलाल जैन यांच्या घरातून 3 लाख 95 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल तसेच शेजारच्या घरातील सोन्याचांदीचे दागिने असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला होता. अलिबाग मुख्य बा

बाजारपेठेत भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे जनमानसांत भीतीचे वातावरण निर्माणझाले होते. या चोरीचे आव्हान स्वीकारत पोलीस अधिक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी लागलीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि पवनकुमार ठाकूर, सहा फौजदार भारत श्रीवर्धनकर, पोलीस हवालदार बंधू चिमटे, हणुमंत सुर्यवंशी, अमोल हंबीर, प्रशांत दबडे, नाईक विशाल आवळे, शिपाई ईश्‍वर लांबोटे असे पथक नेमून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.त्या पथकाने प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीत आरोपीच्या फोटोच्या आधारे नवी मुंबई, मुंबई, ठाणे जिल्हयात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असता तपास पथकातील पोलीस हवादार अमोल हंबीर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी हा अबरार अकबर शेख, रा.नागपाडा, मुंबई हा आहे. त्याप्रमाणे माहीती घेतली असता आरोपीत हा सध्या मंडाळा, मानखुर्द, मुंबई येथे वास्तव्य करीत असल्याची बातमी मिळाली.

तपास पथकातील सपोनि पवनकुमार ठाकूर व पथकाने सदर अबरार अकबर शेख, बच 22 वर्षे, सध्या रा.मंडाळा, 30 फीट रोड, मानखुर्द, मुंबई, कायमचा पत्ता श्रीमती यशोदा श्रीनिवास कसबे यांची रूम नं. 21, पहिला मजला, आर.एस.निमकर मार्ग, नागपाडा, फारस रोड, चिखलपाडा, मुळ रा.शेरेगाव, पो. ता.कराड, जि.सातारा यास मंडाळा, मानखुर्द येथून ताब्यात घेवून त्याचेकडे वरीलगुन्हयाचे कामी सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास 14 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री साडेदहा वाहता अटक करण्यात आले आहे.आरोपीकडे केले तपासामध्ये स्वालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत1) अलिबाग पोलीस ठाणे गु.रजि.नं.160/2021, भा.द.वि.सं.कलम 454, 3802) अलिबाग पोलीस ठाणे गु.रजि.नं.122/2021, भा.द.वि.सं.कलम 454, 457, 380 आरोपीतकडे केले तपासामध्ये खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत1) अलिबाग पोलीस ठाणे गु.रजि.नं.160/2021, भा.द.वि.सं.कलम 454, 3802) अलिबाग पोलीस ठाणे गु.रजि.नं. 122/2021, भा.द.बि.सं.कलम 454, 457, 3803) पेण पोलीस ठाणे गु.रजि.नं. 178/2021, भा.द.वि.सं.कलम 454, 457,380आरोपीत याचेकडून 5 लाख 72 हजार 750/- रूपये किंमतीची मालमत्ता, त्यामध्ये 3 लाख 30 हजार- रूपये रोख रक्कम व 2 लाख 42 हजार 150/- रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.आरोपीचा पुर्व इतिहास पाहाता त्याच्यावर ठाणे, मुंबई परिसरामध्ये दिवसा घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असून त्यास मुंबई व आजुबाजूचे जिल्हयांमधून तडीपार करण्यात आले आहे.

आरोपीवर यापुर्वी दाखल गुन्हे :
1) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 113/2015, भा.द.वि.सं.कलम 399,402,आर्स अ‍ॅक्ट कलम 4,25

2) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 171/2011, भा.द.वि.सं.कलम 454,380

3) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 308/2013, भा.द.वि.सं.कलम 380

4) आग्रीपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 65/2013, भा.द.वि.सं.कलम 380

5) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 104/2015, भा.द.वि.सं.कलम 454,457,380

6) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 297/2013, भा.द.वि.सं.कलम 454,457,380

7) आग्रीपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 232/2016, भा.द.वि.सं.कलम 454, 380

8) मुंब्रा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 130/2018, भा.द.वि.सं.कलम 454,380

9) कळवा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 1377/2017, भा.द.वि.सं.कलम 454,380

10) कळवा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 3/2018, भा.द.वि.सं.कलम 454,380

11) कळवा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 1329/2017, भा.द.वि.सं.कलम 380

12) कळवा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 1158/2016, भा.द.वि.सं.कलम 379

13) नयानगर पोलीस ठाणे गु.रजि.नं. 438/2019, भा.द.वि.सं.कलम 454,380

14) आग्रीपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 78/2014, म.पो.अ‍ॅक्ट 122

15) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 158/2014, म.पो.अ‍ॅक्ट 142

16) डी.बी.मार्ग पोलीस ठाणे गु.रजि.नं. 48/2014, म.पो.अ‍ॅक्ट 142

17) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 276/2015, म.पो.अ‍ॅक्ट 37 (1) मे

18) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 45/2015, म.पो.अ‍ॅक्ट 142

19) नागपाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. 275/2015, म.पो.अ‍ॅक्ट 142

20) जे.जे.मार्ग पोलीस ठाणे ग.रजि.नं. 277/2015, म.पो.अ‍ॅक्ट 142 असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version