| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे सकल भागांत पाणी साचेलेल आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अलिबाग-रेवदंडा मार्गावरील आक्षी गावाजवळील झाड कोसळून विजेच्या तारा तुटून मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तसेच, जिल्ह्यातील अतिवृष्टी भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
पुढिल 48 तास धोक्याचे..
IMD मुंबई यांनी पुढील 48 तासात रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुरप्रवण आणि दरडग्रस्त गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करणात आले आहे. याशिवाय मदतीसाठी DM CELL रायगड 02141-222097/222118 येथे संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.