अलिबाग ते मुरूड एसटी सेवा बंद

पावसाने मार्ग खचला, गणेशभक्ताचे हाल
मुरूड | वार्ताहर |
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर अति मुसळधार पावसाने मुरूड तालुक्याची दैना उडविली असून अनेक रस्ते वाहून गेले आहेत.सोमवार मंगळवार रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुरूड तालुक्यातील काशीद-चिकणी आणि सुपेगाव मार्ग आणि पुलाचा रस्ता खचल्यानें मुरूड ते अलिबाग- मुंबई एस टी बस प्रवाशी सेवा मंगळवार पासून बंद पडली आहे.त्यामुळे चाकरमानी गणेशभक्तांचा येथे येण्याचा मार्ग खडतर बनला असून अनेकांचे हालच हाल होत असल्याचे बुधवारी दिसून येत होते.
चिकणी- काशीद जवळील पूल कोसळल्याने गेल्या महिन्यात सुमारे 15 दिवस एस टी बसेस वाहतूक बंद ठेऊन भालगाव रोहा ते मुरूड अशी 50 किमी लांब अंतरा वरून वळविण्यात आली होती. आता मंगळवार पासून तीच परिस्थिती पुन्हा मुरुडकरांवर आली आहे. या मागें 150/- रुपये जादा भरून गणेशभक्तांना मुरुडला 3 तास आधिक त्रास सहन करून मुरुडकडे यावे लागत आहे.एरव्ही मुरूड काशीद मार्गे अलिबाग अंतर 50 किमी आहे.परंतु रस्ता बंद पडल्याने रोहा मार्गे हेच अंतर 100 किमी पर्यंत जाते. सुपेगाव जवळ रस्ता खचल्यानें हा रस्ता बंद पडला आहे.त्या मुळे अवजड बाहतुक बंद ठेवम्याच्या सूचना तहसील व सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.या रस्त्यांची डागडुगी करण्याचे काम सुरू आहे मात्र पाऊस सुरू असल्याने अनेक अडचणी येताना दिसत आहेत. सध्या सर्व बसेस रोहा भालगाव मार्गे जात आणि येत असल्याची माहिती मुरूड बस आगरातून बुधवारी दुपारी 12 वाजता देण्यात आली.विहूर आणि काशीद गावानजीक आजही एकेरी वाहनांची वाहतूक महिन्यांपासून सुरू असून आता ही नवी आफत अचानक आली असल्याने सर्वजण तणावाखाली आहेत.

मुसळधार पावसामुळे मुरूड तालुक्यातील काशीद-चिकणी आणि सुपेगाव मार्ग आणि पुलाचा रस्ता खचल्यानें मुरूड ते अलिबाग- मुंबई एस टी बस प्रवाशी सेवा मंगळवार पासून बंद पडली आहे.यंदाच्या गणेशोत्सवात पावसाने मोठे संकट उभे केले असल्याने भक्तांवर विचित्र आफत आणि मोठीच कुचंबना ओढविली आहे. सार्वजनिक बांधकाम मुरूडचे अभियंता श्री गनगणे, यांनी काल दुपारी सांगितले की, काशीद चिकणी रस्ता दुपारी बांधकाम करून सुरू केला आहे मात्र सुपेगाव मार्गाचे रुंदीकरण वनखात्याच्या नियमांमुळे अडकले असून लवकरच मार्गी लागेल अशी माहिती श्री गनगणे यांनी दिली.काशीद मार्ग त्वरित सुरु होणे गरजेच आहे असे मत ठिकठिकाणी बुधवारी सकाळी ऐकायला मिळत होते.सध्या मुरूड तालुका खुपच संकटातून जात असून श्री गणराया, यातून भक्तांच्या वाटेला नक्कीच धावून येईल अशी श्रद्धा अनेकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version