विठूनामाच्या गजरात दुमदुमली अलिबाग नगरी

आषाढीनिमित्त पायी दिंडी सोहळा उत्साहात
अलिबाग | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग शहरप्रमुख अशोक प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग शहरात व्यापारी वर्गाच्या पुढाकारातून बुधवारी पायी दिंडी काढण्यात आली. त्यामुळे विठूनामाच्या गजरात संपूर्ण अलिबाग नगरी दुमदुमून गेली होती. या दिंडीत सहभागी झालेले भाविक विठूनामात लीन झाले होते, त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याचे दिसून आले.

अलिबाग बाजारपेठेतून विठूनामाच्या गजरात दुपारी चार वाजता पायी दिंडीचे प्रस्थान झाले. या दिंडीमध्ये 20 ते 25 जण दिंडीत सामील होते. वारीचे हे प्रथम वर्ष असून, पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात वारीचे स्वरूप असेल, असे अशोक प्रधान यांनी सांगितले.या दिंडीत अशोक प्रधान, सचिन ढवळे, सतीश प्रधान, संदीप ठाकूर, मधुकर प्रधान, जितेंद्र मेहता, गोट्या जैन, सागर प्रधान, संतोष ल्हासे, मयूर दाबी (बाडा), मुकुंद म्हात्रे आणि इतर बहुसंख्य भाविक सहभागी झाले होते. दिंडीचे स्वागत विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी केले.

Exit mobile version