। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत श्रीगाव हद्दीतील मेढेखार येथील श्रावणी संकष्टी निमित्ताने मेढेखार ते श्री क्षेत्र पाली येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी (दि. 22) सकाळी सहा वाजता मेढेखार गावातील सुप्रसिद्ध गणपती मंदिर येथून प्रस्तान केलेल्या या दिंडीचे यंदाचे 12 वे वर्ष असुन या दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील मुंबई, मेढेखार, श्रीगाव, भाकरवड, देहेन, काचली, पिटकीरी, कुर्डुस, चिखली, आदिवासी वाडी आदी विभागांतून आठशेहुन अधिक भाविक भक्तगण सहभागी झाले होते. या दिंडीमध्ये सर्वधर्म, समभाव, विश्वबंदुत्व जपणूक करणारी सर्वाना एकोप्याने मार्गस्थ लावणारी व कोणतेही मतभेद न ठेवता आनंदाने अविरतपणे प्रामुख्याने चालणारी पायी दिंडी म्हणून नावारूपाला आहे. दिंडी मार्गस्थ झाल्यापासून ते पाली बल्लाळेश्वर येते पोहचेपर्यत सर्व भक्तांना चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात येते.
मेढेखार येथून प्रस्थान होणारी ही पदयात्रा दिंडी, प्रथम कुर्डुस नाक्यावर तद्नंतर सांबरी येथील दत्तमंदिरमध्ये नंतर आयपीसीएल गेट, वाकण मार्गाने पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.