| लंडन | वृत्तसंस्था |
ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदाच दोन्ही महिला संघांतील कसोटी सामना होणार आहे. 2026मध्ये भारत-इंग्लंड यांच्यात पहिला महिला कसोटी सामना रंगणार आहे, अशी घोषणा इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारी (दि.22) केली. जुलै 2025मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ 2026मध्ये एका कसोटीसाठी पुन्हा इंग्लंडला येणार आहे. ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड यांनी सांगितले की,
भारतीय संघ 2026मध्ये लॉर्ड्समध्ये एकमेव कसोटी सामना खेळेल. इंग्लंडच्या महिला संघाने मागील तीन वर्षांपासून लॉर्ड्सवर पांढऱ्या चेंडूवरील सामने खेळले आहेत. पुढील वर्षी आणखी एक सामना होणार आहे. पण, महिलांच्या कसोटी सामन्यात भारताचे यजमानपद भूषवण्याची ही या मैदानाची पहिलीच वेळ असेल. भारतीय संघाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि यावर्षी जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यांत विजय मिळवला होता. भारताने इंग्लंडविरुद्ध मागील कसोटी सामना 2021मध्ये ब्रिस्टल येथे खेळला होता. हा सामना ड्रॉ झाला होता.
भारत-इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे वेळापत्रक
टी-20 मालिका सामना स्थान तारीख
पहिला नॉटिंगहॅम 28 जून 2025
दुसरा ब्रिस्टल 1 जुलै 2025
तिसरा द ओव्हल 4 जुलै 2025
चौथा मँचेस्टर 9 जुलै 2025
पाचवा बर्मिंगहॅम 12 जुलै 2025
वनडे मालिका
सामना ठिकाण तारीख
पहिला साउदम्पटन 16 जुलै 2025
दुसरा लॉर्ड्स 19 जुलै 2025
तिसरा चेस्टर ली स्ट्रीट 22 जुलै 2025