| रायगड | प्रतिनिधी |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग, जिल्हा क्रीडा परिषद, रायगड यांच्या माध्यमातून विविध खेळांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा व चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरिता 25 मे ते 10 जून या कालावधीत सकाळी ठिक सात ते नऊ या वेळेत उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात अथलेटिक्स, कराटे, तायक्वांदो, योगा, लगोरी अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी, क्रीडा मार्गदर्शक यतीराज पाटील, प्रियांका गुंजाळ यांचे प्रशिक्षण लाभत असून या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.







