| पोयनाड | प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी लोधीवली संघाने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिली आहे.
अंतिम फेरीत त्यांचा सामना फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाबरोबर होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी संघाने जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाचा 149 धावांनी पराभव केला असून जगदीश क्रिकेट अलिबाग संघाला स्पर्धेत तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी संघाने निर्धारित 40 षटकांमध्ये अवघा एका फलंदाज गमावत 273 धावा काढल्या त्यामध्ये सलामीवीर तंत्रशुद्ध फलंदाज शुभंकर माने यांनी धडाकेबाज फलंदाजी करत 100 धावा काढून शतक पूर्ण केले,त्याला सुयश पारंगे यांनी 87 यश पार्टे 46 धावा काढून संघाला योगदान दिले.







