| कापोली | प्रतिनिधी |
गुरुद्वारा मैदान, सानपाडा, नवी मुंबई येथे गावदेवी क्रिकेट क्लब मुंबई (बोर्ली पंचतन) चा पहिला क्रीडा महोत्सव संपन्न झाला. यावेळी श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील 32 क्रिकेट संघाने सहभागी घेतला होता. या मंडळाची स्थापना गतवर्षी 31 मे 2025 झाली असून वेगवेगळे उपक्रम राबवित यंदाच्या मोसमातील ही पहिलीच स्पर्धा 31 मे 2026 गुरुद्वार मैदान सानपाडा नवी मुंबई येथील मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी प्रमुख पाहुणे दत्तात्रेय धनावडे, ॲड. धनंजय चौलकर, विराज गायकर, अनंत पाटील अजय पयेर, आदेश धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिक वितरण श्रीवर्धन पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर व ड्रग्स फ्री फ्युचर फाऊंडेशन नवी मुंबईचे अध्यक्ष नरेश चाळके यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक गावदेवी सकलप खूर्द, द्वितीय क्रमांक खरगाव बुद्रूक, तृतीय क्रमांक नानारे क्रिकेट क्लब तर चतुर्थ क्रमांक खरगाव बुद्रूक यांनी पटकाविले.
गावदेवी क्रिकेट क्लब मुंबईचे अध्यक्ष हेमंत धनावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज आमच्या संघाचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न झाला यावेळी आमच्या सर्व सदस्यांनी योग्यती मेहनत घेऊन आपला क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडला. तसेच या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सढळ हस्ते आर्थिक व वस्तूरूपी मदत केली अश्या देणगीदारांचे आभार व्यक्त करुन पुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. या स्पर्धेत समालोचक नितीन गायकर आणि बंटी (कोडे पंचतन) पंच व लेखनिक रितेश, मनिष, अक्षय, शैलेश, दिप, राज, अनिकेत,कल्पेश, महेश, अनिरुद्ध, प्रेम, प्रणय, प्रतीक, धनेश, प्रथम, अजय, मनोज यांनी उत्तम कामगिरी बजावली.







