। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जलपाडा येथे दुरुस्तीचे काम निघाल्याने मंगळवारी अलिबाग शहराला एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.18) सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच बुधवार (दि.19) व गुरुवारी (दि.20) शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी केले आहे.