अलिबागकर नितीन खारकर यांचा राष्ट्रीय गौरव

‘राधा’ अ‍ॅनिमेशन शॉर्ट फिल्मसाठी ठरले बेस्ट अ‍ॅनिमेटर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागकर असणारे सुप्रसिद्ध अ‍ॅनिमेटर नितीन रविंद्र खारकर यांच्या राधा या अ‍ॅनिमेशन शॉर्ट फिल्मसाठी बेस्ट अ‍ॅनिमेटर म्हणून भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नितीन खारकर यांच्या या यशाबद्दल संपूर्ण अलिबागसह रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होते आहे.
मूळचे पुतुबाईचा पाडा पो.बामणगाव, अलिबाग येथील रहिवाशी असलेले नितीन खारकर हे मुंबई येथील गोरेगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या राधा या अनिमेशन शॉर्ट फिल्म साठीचा बेस्ट अ‍ॅनिमेटर म्हणून निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version