तारकांसोबत अलिबागकर लुटणार कृषीवल हळदीकुंकूवाचे वाण

पीएनपी नाट्यगृहात रंगणार सोहळा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

कृषीवलतर्फे गेली 27 वर्षांपासून आयोजित केला जाणारा दिवस मानाचा सौभाग्याचा हळदीकुंकू (Krushival Haldikunku) सोहळा हा कार्यक्रम बुधवारी (दि.18) अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात मराठी सिनेतारकांच्या विशेष उपस्थितीत सायंकाळी चार वाजता रंगणार आहे. 28 व्या वर्षात पदापर्ण करणारा या विक्रमी सोहळ्यात महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख तथा कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील (Chitralekha Patil) यांनी प्राप्त करुन दिली आहे.

या हळदीकुंकू कार्यक्रमास सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील प्रसिद्ध ‘आर्शिवाद तुझा एकविरा आई’ फेम मयुरी वाघ (Mayuri Wagh), तसेच ‘जिवाची होतिया काहिली’ फेम प्रतिक्षा शिवणकर (Pratiksha Shiwankar) आणि राज हंचनाळे (Raj Hanchanale), श्रुतकिर्ती सावंत (Shrutkirti Sawant) त्याचप्रमाणे ‘प्रतिशोध झुंज अस्तित्वाचा’ फेम पायल मेमाणे (Payal Memane)अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. या हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांना एक वेगळीच पर्वणी मिळणार आहे. विक्रमावर विक्रम करणाहा सोहळा म्हणजे अलिबाग तालुक्यातील महिलांना सौभाग्याचे लेणे आणि साजश्रृंगार करण्यासाठी एक उत्सवच बनू पहात आहे.

सुधागड-पालीमध्ये 21 जानेवारीला आयोजन
सुधागड-पाली येथील मराठा समाज हॉल येथे 21 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 7 दरम्यान वाजता हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तारकांसह शेकापक्षाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

खालापूरमध्ये 28 जानेवारीला लुटा वाण
खालापूरमध्ये हळदीकुंकूवाचे वाण लुटण्यासाठी शेकाप महिला आघाडी तथा कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी महिलांना संधी दिली आहे. 28 जानेवारील रोजी खालापूर फाटा मैदान, श्रीकृष्ण पेट्रोलपंपाच्या जवळ दुपारी 4 ते सायं.7 वाजेपर्यंत हळदीकुंकू कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास देखील सोनी मराठी वरील अनेक तारे तारकांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व सोहळयाला उपस्थित राहून सौभ्याचे वाण लुटण्याचे आवाहन कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version