अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. विविध डिप्लोमा कोर्सेस मूळे आपले आवडते क्षेत्र निवडण्याची संधी मुलां-मुलींना मिळत आहे,आणि त्याचा पुरेपूर फायदा ते करूनही घेत आहेत. त्यासाठी द्यावी लागणारी प्रवेश परीक्षा सुद्धा देण्याची त्यांची तयारी असते,अशीच प्रवेश परीक्षा देऊन देशात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अलिबागच्या हिमांशू संजय शिरगावकर या मुलाने लक्षवेधी काम केले आहे.
हिमांशू शिरगावकर हा अलिबागेत आर सी एफ शाळेतून शास्त्र शाखेतून 12 वि पास झाला. पदवी कडे वळण्या ऐवजी त्याने हॉटेल मॅनेजमेंटला पसंती दिली. हिमांशू ला वेगवेगळ्या रेसिपी बनवण्यात आवड आहे. तो सहावीत असल्या पासून पाक कलेत पारंगत झाला. आणि पुढे जाऊन यातच करिअर करायचे असे त्याने ठरवले. 17 वर्षाच्या हिमांशू शिरगावकरला पर्यटन आणि हॉटेल व्यवसायात प्रचंड रुची आहे. महाराष्ट्रीयन,आणि continental पदार्थ बनवणे त्याला खूप आवडते.
मोठं मोठ्या हॉटेलमध्ये सेफ म्हणून काम करणारे या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतात. शिवाय पुढे जाऊन नोकरी करणे नाही शक्य झाले तर स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करता येईल, या उद्देशाने देखील आजचा युवक पदवी कोर्स कडे पाहत आहे. हिमांशू ने नॅशनल काँसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट जे इ इ च्या माध्यमातून प्रवेश परीक्षा दिली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा घेतली. जवळपास 18000 हजार विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यातून हिमांशू देशात पाचव्या क्रमांकाने पास झाला.
त्याचा हॉटेल मॅनेजमेंटचा हा कोर्स 3 वर्षाचा आहे. दिल्लीत आय .एच .एम पुसा कॉलेजची पदवी साठी निवड केली आहे. प्रदेश काँग्रेसचे सचिव ऍड. प्रवीण ठाकूर यांनी हिमांशू शिरगावकर याने देशात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची कामगिरी केल्या बद्दल त्याचे आणि वडील संजय शिरगावकर यांचे विशेष कौतुक केले आहे. भविष्यात असाच नावलौकिक मिळवून स्वतःचे आणि अलिबाग चे पर्यायाने रायगडचे नाव मोठे कर, अशी सदिच्छा व्यक्त केली.