अलिबागच्या शुभमची भारतीय संघात निवड

मलेशियातील स्पर्धेत लाठी संघाचे करणार प्रतिनिधीत्व
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागच्या शुभम नखाते याने लाठी नॅशनल चॅम्पियनशिप 2022-23 मध्ये सुवर्णपदक पटकावले असून, मलेशिया येथे होणार्‍या लाठी इंटरनॅशनल गेम्ससाठी त्याची भारताच्या सिनिअर लाठी संघात निवड झाली आहे. अलिबागचे नाव सातासमुद्रापलीकडे नेणार्‍या शुभमचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येणार आहे.
भारताला परंपरेने अनेक गोष्टी लाभल्या आहेत. आणि खेळ हा त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक युगातही हीच परंपरा जोपासत आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचे काम अनेकजण करीत असतात. त्यामध्येच सोलापूर येथे दि.26 ते 27 रोजी दुसरी राष्ट्रीय लाठी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत लाठी महाराष्ट्र संघातून रायगड जिल्हाच्या 13 खेळाडूंनी महाराष्ट्राचे नेत्तृव केले. तसेच लाठी महाराष्ट्र संघासाठी 12 सुवर्णपदक, 1 रौप्यपदक, आणि 2 कांस्यपदक अशी नेत्रदीपक कामगिरी केली. सुवर्णपदक विजेत्यांची मे महिन्यात मलेशिया येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना गुरु प्रियंका संदेश गुंजाळ यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले.
ज्युनिअर गटात शिवम संदेश गुंजाळ 1 सुवर्ण, 1 रौप्य, मल्हार संदेश गुंजाळ 2 सुवर्ण, प्रियेश प्रचित मासाळ 1 सुवर्ण, अंश मनाज म्हात्रे 1 सुवर्ण, देवदत्त मनीष पडवळ 1 सुवर्ण, शिव देवजी हिलम 1 कांस्य, शुभम महेंद्र नखाते 1 सुवर्ण, स्नेहा प्रचित पडवळ 1 सुवर्ण, लावण्य प्रवीण पाटील 1 सुवर्ण, नम्रता गणेश चव्हाण 1 सुवर्ण, सना सत्यजित तुळपुळे 1 सुवर्ण, माही खामीस 1 कांस्य, सृष्टी 1 सुवर्ण यांनी भरघोस यश मिळविले आहे. त्यांचीही मलेशिया येथे होणार्‍या लाठी इंटरनॅशनल गेम्ससाठी भारताच्या ज्युनिअर लाठी संघात निवड झाली आहे.

Support authors and subscribe to content

This is premium stuff. Subscribe to read the entire article.

Subscribe

Gain access to all our Premium contents.
More than 100+ articles.

Buy Article

Unlock this article and gain permanent access to read it.
Exit mobile version