मुरूड | प्रतिनिधी |
मुरुड जंजिऱ्याची स्नेहा प्रचित मसालाने भारताच्या जूनियर लाटी संघातून नेपाल येथे नुकत्याच झालेल्या एशियन लाठी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून मुरूडच्या नावामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे मुरुडमध्ये स्नेहावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.
आधुनिक युगात ही परंपरागत खेळ लाठी आहे. आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचे काम अनेक जण करीत असतात त्यामध्ये मुरुड येथील कु स्नेहा प्रचित मसालाने सोलपुर येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत महाराष्ट्र संघातून नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे स्नेहा प्रचीत मसाल हिची भारताच्या जुनियर लाठी संघामध्ये निवड झाली होती.